
दिव्यांग बांधवांसाठी नवा आशेचा किरण ..! वाशिममध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
दिव्यांग बांधवांसाठी नवा आशेचा किरण ..!
वाशिममध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
वाशिम, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा दिव्यांग कल्याण विभागाच्या अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय १ मे २०२५ पासून स्थापन करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते. त्याअन्वये दि. ५ मे २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर, वाशिम येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डी.एम. पुंड यांची उपस्थिती होती.
कार्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या जलद गतीने मार्गी लागतील. तसेच दिव्यांगांच्या सर्व विविध योजना त्यांना एकाच छताखाली मिळवता येतील.अशी सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमास दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मनीष डांगे, दिव्यांग नागरिक, जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "दिव्यांग बांधवांसाठी नवा आशेचा किरण ..! वाशिममध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन संपन्न "
Post a Comment