
जाधव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
जाधव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
वाशिम _ श्री तुळशीरामजी जाधव व कला व विज्ञान महाविद्यालय, वाशिम मध्ये मराठी भाषा अभ्यास मंडळ विभागाच्या वतीने महाविद्यालयात वि. वा .शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी
अध्यक्ष महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. पद्मानंद तायडे होते .या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध सूत्रसंचालक व कवी डॉ. विजय काळे हे उपस्थित होते .
संपूर्ण भारतभर ज्यांची गझल प्रसिद्ध आहे असे प्रा. फारुख जमन सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्रा.अवचार मॅडम यांनी केले मराठी अभ्यास मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली .या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना कवी विजय काळे यांनी भाकरीचा मेळ लावतो ही कविता देखील सादर केली. त्यांनी मराठी भाषा ही किती समृद्ध आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रा.जमन सर यांनी देखील मराठी गझल याविषयी आणि मराठी भाषेने भारतीय साहित्यात मोलाचे योगदान केले आहे असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले सांगितले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमात प्रियंका कव्हर ,वैष्णवी गोरे रूपाली वाणी ,हर्षदा उखडे , जानवी संघवार, गायत्री अरणकर ,या विद्यार्थिनींनी मराठी भाषा चा गौरव करणाऱ्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमांचे अध्यक्ष भाषण करताना पद्मानंद तायडे यांनी मराठी भाषा महत्त्वही सांगितले. आणि काही कवितांचा परिचय ही करून दिला याच कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा गौरव असा एक मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या कवितांचा एक भिंती पत्र तयार केले .त्याचे उद्घाटन फारूक जमन सर विजय काळे डॉ. पद्मनांत तायडे ,प्रा. रिंकू रुके डॉ. ढवारे प्रा. अवचार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली वाणी यांनी केले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यामध्ये हिमांशू थोरात ,अक्षय सरकटे ,सचिन नवघरे, योगेश वाघ, मंगेश सोळंके, दीपक सोनवणे, शुभम कव्हर ,शुभम सोनवणे , इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले ते प्राध्यापक रिंकू रुके यांचे या कार्यक्रमाचे आभार प्रियांका, कव्हर हिने केले.
0 Response to "जाधव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा"
Post a Comment