-->

जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती  सदस्यांची निवडीसाठी 20 मार्चपर्यंत अर्ज मागविले

जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती सदस्यांची निवडीसाठी 20 मार्चपर्यंत अर्ज मागविले

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती

सदस्यांची निवडीसाठी 20 मार्चपर्यंत अर्ज मागविले

       वाशिम,  : जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती, वाशिम या समितीवर अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या समितीसाठी जिल्हयातील पशुमित्र अथवा सेवाभावी संस्थेत कार्य करणाऱ्या नागरीकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 20 मार्च 2023 आहे. इच्छुकांनी आधार कार्ड, पशुमित्र अथवा सेवाभावी संस्थेत काम करीत असल्याचा पुरावा या कागदपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा पशुसवंर्धन उपायुक्त कार्यालय, वाशिम येथे सादर करावा.

          जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे राहील. जिल्हयातील गोशाळा व पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष - 1, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य- 2, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती- 2 आणि मानवहितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे व प्राणी कल्याणासाठी काम करणारे -6 याप्रमाणे राहील. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वाशिम यांनी कळविले आहे.



Related Posts

0 Response to "जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती सदस्यांची निवडीसाठी 20 मार्चपर्यंत अर्ज मागविले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article