" श्रींच्या शैल्य गमण यात्रेनिमित्त, ऐतिहासिक बेंबळपाटाची सफाई व रंगरंगोटी करण्याची पत्रकाराची मागणी !
साप्ताहिक सागर आदित्य/
" श्रींच्या शैल्य गमण यात्रेनिमित्त, ऐतिहासिक बेंबळपाटाची सफाई व रंगरंगोटी करण्याची पत्रकाराची मागणी
कारंजा (लाड) : १७ फेब्रु. रोजी, दत्तउपासकांचे आराध्य दैवत, श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराजांची शैल्यगमण यात्रा असून त्या निमित्ताने संपूर्ण भारतातून दत्तउपासक येथे येत असतात . श्री गुरुमंदिरच्या "करंजमहात्म्य" ग्रंथामध्ये, बेंबळपाटाचा - बेंबळा नदीच्या उगमस्थानाचा उल्लेख असल्यामुळे, बाहेरगावची मंडळी, आवर्जून बेंबळपाट बघायला येतात व बेंबळपाटा समोरील श्री दत्तमंदिरला सुद्धा भेट देतात . बेंबळपाट म्हणजे पुरातन व ऐतिहासिक ठेवा आहे . मात्र सद्य स्थितीत बेंबळपाटा मध्ये, रहदारीची धुळ, केरकचरा व शेवाळयुक्त हिरवेगार दुर्गंधीयुक्त पाणी झाल्यामुळे तसेच बऱ्याच कालावधी पासून रंगरंगोटी नसल्यामुळे कारंजा शहरातील नागरीकांची मागणी होत असल्यामुळे, महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, पत्रकार एकनाथ पवार, मोहम्मद मुन्निवाले, उमेश अनासाने, नंदकिशोर कव्हळकर, विजय पाटील खंडार,माजी नगराध्यक्ष संजय काकडे, माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड आदींनी दि . १२ फेब्रु रोजी, सध्या कारंजा नगर परिषदेला, प्रशासकिय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी असल्यामुळे त्यांचे कार्यालयाला भेट दिली व त्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार धिरज मांजरे यांना निवेदन सादर केले असता, नगर पालिके कडून हे काम येत्या दोन तिन दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी पत्रकारांना दिले .
0 Response to "" श्रींच्या शैल्य गमण यात्रेनिमित्त, ऐतिहासिक बेंबळपाटाची सफाई व रंगरंगोटी करण्याची पत्रकाराची मागणी !"
Post a Comment