-->

दुकानाचे नामफलक मराठीत असणे आवश्यक  सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

दुकानाचे नामफलक मराठीत असणे आवश्यक सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन



साप्ताहिक सागर आदित्य 

दुकानाचे नामफलक मराठीत असणे आवश्यक

सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन


वाशिम,  :  प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरुवातीला मराठीत नाव असणे आवश्यक आहे. अशा तरतुदीची महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियम अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमाच्या कलम 7 नुसार ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहे,अशा सर्व आस्थापनांना कलम 36 क (1) कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत 10 पेक्षा अधिक कामगार आहे अशा सर्व आस्थापनेचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. परंतू अशा आस्थापनेच्या नियोक्त्यांकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरीक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतात. परंतू मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातील लिहीणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षराचा टंक (Font) आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षराचा टंक (Font) आकारापेक्षा लहान असणार नाही तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहीणार नाही. असा बदल शासनाने 17 मार्च 2022 रोजीच्या अधिनियमात केला आहे.


तरी जिल्हयातील सर्व आस्थापना मालकांनी या अधिनियमातील तरतुदीचे तंतोतंत पालन करावे. या तरतुदीचे भंग करणाऱ्या आस्थापना मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ.शि.राठोड यांनी केले आहे.



0 Response to "दुकानाचे नामफलक मराठीत असणे आवश्यक सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article