पत्रकार प्रकाश पाटील लहाने यांना 'ज्ञानमूर्ती' पुरस्कार प्रदान !
साप्ताहिक सागर आदित्य/
पत्रकार प्रकाश पाटील लहाने यांना 'ज्ञानमूर्ती' पुरस्कार प्रदान !
वाशिम : ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजा कडून, धार्मिक - आध्यात्मिक - सामाजिक -साहित्य - कला - पत्रकारीता क्षेत्रातील कार्याबद्दल राज्यस्तरीय " ज्ञानमूर्ती " पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो . सन 2021 च्या पुरस्कारा करीता, वाशीम येथील सेवाभावी, विठ्ठलभक्त वारकरी तथा साप्ताहिक सागरआदित्य चे संपादक, प्रकाश पाटील लहाने यांची निवड, ज्ञानगंगाचे जिल्हाध्यक्ष ओंकार मलवळकर तथा उमेश अनासाने यांनी केली होती . आज दि. 13 फेब्रु रोजी, वाशीम येथील, केमिस्ट भवनच्या श्री जगन्नाथजी शिंदे सभागृहात, अखिल भारतिय योग शिक्षक महासंघ तथा जिल्हा औषध विक्रेता संघ वाशीमचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील सिरसाट यांचे अध्यक्षतेखाली, प्रमुख उपस्थिती ज्ञानगंगाचे संस्थापक संजय कडोळे आणि अ . भा . योग शिक्षक महासंघाचे सचिव दत्तराव भिसडे महाराज यांचे हस्ते प्रकाश पाटील लहाने यांचा शाल, पुष्पगुच्छ, समानचिन्ह तथा सन्मानपत्र देऊन ज्ञानमुर्ती राज्यस्तरिय पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी योग प्रशिक्षणार्थी ओंकार गायकवाड, आशिष पुंडगे, गणेश सोरे, ऋतीक शिंदे, शिवा पचांगे, गजानन जाधव, धनंजय पचांगे इत्यादीची उपस्थिती होती .
0 Response to "पत्रकार प्रकाश पाटील लहाने यांना 'ज्ञानमूर्ती' पुरस्कार प्रदान !"
Post a Comment