-->

स्वर्गीय शकुंतला रमेश शर्मा यांचे मरणोत्तर नेत्रदान

स्वर्गीय शकुंतला रमेश शर्मा यांचे मरणोत्तर नेत्रदान



 साप्ताहिक सागर आदित्य 

स्वर्गीय शकुंतला रमेश शर्मा यांचे मरणोत्तर नेत्रदान 


स्थानिक शुक्रवार पेठ ता. जि. वाशिम येथील श्री. मनोज रमेश शर्मा यांची आई स्व. शकुंतला रमेश शर्मा यांच्या वयाच्या ६९ व्या वर्षी दिनांक ०७/१०/२०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपूर्ण शर्मा कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या स्व. शकुंतला रमेश शर्मा यांचे निधन झाल्याने संपूर्ण शर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना शर्मा कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करून दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा रविभाऊ मारशेटवार याच्यांकडे व्यक्त केली त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पूरी नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. बेदरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी  ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक  रमेश ठाकरे यांनी स्व. स्व. शकुंतला रमेश शर्मा यांची नेत्र बुबूळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता रामानुज शर्मा व सर्व शर्मा कुंटुबाचे सहकार्य लाभले.


तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  वैभव वाघमारे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन शर्मा कुटूंबाचे आभार मानले आहेत.


नेत्रदानासाठी संपर्क क्रं.९९२२५१९९४८ (जि.रु. वाशिम)

Related Posts

0 Response to "स्वर्गीय शकुंतला रमेश शर्मा यांचे मरणोत्तर नेत्रदान "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article