स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून आलेला निधी खर्च करण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांनी निर्देश दिले.
साप्ताहिक सागर आदित्य
मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये ग्राम पंचायत अधिकाऱ्यांची सभा
गट विकास अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी घेतला आढावा.
जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि. १०) पंचायत समिती मंगरूळपीर येथे सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा सभा घेतली. यावेळी वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे, हागणदारीमुक्त अधिक गावे मॉडेल करणे, नल जल मित्रांची निवड करणे, पाणी नमुने संकलन इत्यादी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पंधरावा वित्त आयोग, आवास योजना ईत्यादि विषयांचाही यावेळी गाव निहाय आढावा घेण्यात आला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून आलेला निधी खर्च करण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांनी निर्देश दिले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी साखरे, विस्तार अधिकारी (पंचायत) भाऊराव बेलखेडकर, जिल्हा कक्षाचे राम श्रृंगारे, शंकर आंबेकर, अभिजीत दुधाटे, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. माहुलकर, तालुका समन्वयक प्रविण आखाडे आणि अभिजित गावंडे यांची उपस्थिती होती.
चौकट:
नुकतीच मंगरुळपीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणुन श्रीराम कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते अमरावती जि. प. मध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. त्यांची वाशिम जिल्हा परिषदेत बदली झाल्यानंतर सीईओ वैभव वाघमारे यांनी कुलकर्णी यांना जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचा उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सोपविला. स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण अंतर्गत गावे मॉडेल करणे आणि सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापनाची कामे मार्गी लावण्याचे आव्हान आहे.
0 Response to "स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून आलेला निधी खर्च करण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांनी निर्देश दिले."
Post a Comment