
भारत राष्ट्र समिती पार्टी चे अमरावती विभागसमनव्यक निखिल देशमुख यांचा वाशिम दौरा संपन्न...
साप्ताहिक सागर आदित्य
भारत राष्ट्र समिती पार्टी चे अमरावती विभागसमनव्यक निखिल देशमुख यांचा वाशिम दौरा संपन्न...
वाशिम :- भारत राष्ट्र समिती पार्टी चे अमरावती विभाग समनव्यक निखिल देशमुख यांचा वाशिम जिल्हा दौरा सपन्न झाला .असून भारत राष्ट्र समिती पार्टी चा आढावा बैठक घेतली असून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा प्रमुख संपूर्ण जिल्ह्यात सदस्य नोंदनी अभियान सुरू असून या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती पार्टी चे सदस्य अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने विधानसभा प्रमुख याना निखिल देशमुख यांनी मार्गदर्शन केले व जोमाने लागा असे सर्व कार्यकर्ते यांना सांगितले. मालेगाव येथील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकऱ्यांनी अन्य लोकांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला .यावेळी निखिल देशमुख यांनी नव नवीन कार्यकर्ते, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित . अमरावती विभाग समनव्यक निखिल देशमुख, जिल्हा समनव्यक सुनील लहाने, वाशिम मंगरूळ विधानसभा प्रमुख रितेश देशमुख, कारंजा, मनोरा विधानसभा प्रमुख संतोष दुर्गे, रिसोड मालेगाव विधानसभा प्रमुख अमर कानडे, कृष्णा गायकवाड, शुभम इंगोले. शुभम मोरे, इतर सर्व कार्यकर्ते व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य होते
0 Response to "भारत राष्ट्र समिती पार्टी चे अमरावती विभागसमनव्यक निखिल देशमुख यांचा वाशिम दौरा संपन्न..."
Post a Comment