शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाम फाउंडेशन द्वारे आर्थिक सहयोग
साप्ताहिक सागर आदित्य/
मालेगाव - शेतकरी हा देशाचा पोशिंदा असताना शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या देशात लाजिरवाणी बाब असून अशा कठीण परिस्थितीत आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभे पाण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून 2016 ला नाम फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली आज पूर्व अनेक गरजू शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाम फाउंडेशन द्वारे आर्थिक सहयोग म्हणून शिलाई मशीन तसेच शेळी वाटप व शेवाया मशिन वाटप करण्यात आले आहे.
नुकताच मालेगाव तालुक्यातील आत्महत्या झालेल्या कुटुंबातील
15 परिवारांना नाम फाउंडेशन च्या वतीने व नाम चे विदर्भ खानदेश प्रमुख हरीश दादा इथापे यांच्या प्रयत्नातूनव वा पुढाकारातून आत्महत्याग्रस्त परिवाराला पंचवीस हजार रुपये सानुग्रह अनुदानाचे प्रत्यक्ष धनादेश वाटप करण्यात आले.नाम चे वाशिम जिल्हा समन्वयक डॉक्टर अश्विन सुरूशे यांच्या पुढाकारातून धनादेश वाटप कार्यक्रम तहसील मालेगाव कार्यालय मीटिंग सभागृह मालेगाव येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसंगी तालुका दंडाधिकारी रवी काळे व प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सावंत नायब तहसीलदार दिनकर केंद्रे पशुधन पर्यवेक्षक अधिकारी डॉ. सुनिता सोळंके व नामचे जिल्हा डॉक्टर अश्विन सुरूशे सामाजिक कार्यकर्ते गजानन बोरचाटे व अमोल बैस उपस्थित होते या प्रसंगी वेळी बोलताना नाम फाउंडेशन ची माहिती व उद्देश डॉक्टर सुरोशे यांनी बोलताना व्यक्त केली . यावेळी मिळालेली रक्कम व्यवसायात किंवा उद्योगात वापरावी असे विधान माननीय काळे साहेब यांनी केले त्यानंतर तालुका कृषी अधिकारी सावंत साहेब यांनी शेतकऱ्यांनी शेती व नापिकीला कंटाळून कधीही टोकाची भूमिका घेऊ नये या शब्दात आपल्या भावना शेतकऱ्या प्रती व्यक्त केल्या व नाम कडून मिळालेली आर्थिक स्वरूपात मदत ही आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी करावी असे सुचवले . यावेळी यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर आयोजन डॉक्टर सुरोशे यांनी केले व आभार प्रदर्शन मंगेश गवळी यांनी केले यावेळी मालेगाव तालुक्यातील 15 महिला प्रत्यक्ष धनादेश स्वीकारण्यासाठी उपस्थित होत्या.
0 Response to "शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाम फाउंडेशन द्वारे आर्थिक सहयोग"
Post a Comment