-->

१९ डिसेंबरपर्यंत जनावरांचे वंध्यत्व निवारण अभियान

१९ डिसेंबरपर्यंत जनावरांचे वंध्यत्व निवारण अभियान



साप्ताहिक सागर आदित्य 

१९ डिसेंबरपर्यंत जनावरांचे वंध्यत्व निवारण अभियान


वाशिम, शेतकरी पशुपालक यांचेकडील गाई म्हशींमध्ये असलेल्या/उदभवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी १९ डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.

              या अनुषंगाने जिल्हयामध्ये एकुण ६२ पशुवैद्यकीय संस्थेअंतर्गत एकुण ६७६ गावामध्ये वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यासाठी व्यापक प्रसिध्दी देण्यात आली आहे. गावपातळीवर दवंडी देणे,पत्रके वाटप करणे,पोस्टर्स लावणे ग्रामसभेचे आयोजन करणे,म्हशीचे प्रजनन, कृत्रिम रेतन,गर्भतपासणी,वंध्यत्व निवारण,वैरण विकास कार्यक्रम व पशुस्वास्थ याबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी.

          ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक गावात तज्ञांमार्फत गाई व म्हशींची वंध्यत्व निवारण करण्यासाठी परिक्षा करण्यात येईल. व उपचार करुन मार्गदर्शन करण्यात येईल.असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.अरुण यादगीरे यांनी कळविले आहे.

0 Response to "१९ डिसेंबरपर्यंत जनावरांचे वंध्यत्व निवारण अभियान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article