-->

सहाशे किलोमिटरची ब्रेवेट सायकल मोहीम यशस्वी पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना सायकलस्वारांची श्रध्दांजली

सहाशे किलोमिटरची ब्रेवेट सायकल मोहीम यशस्वी पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना सायकलस्वारांची श्रध्दांजली


साप्ताहिक सागर आदित्य/

सहाशे किलोमिटरची ब्रेवेट सायकल मोहीम यशस्वी पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना सायकलस्वारांची श्रध्दांजली 

विविध जिल्ह्यातून ३ महिलांसह २६ सायकलप्रेमींचा सहभाग
वाशिम रंडोनिअर ग्रुपचा उपक्रम

वाशिम - गेल्या अनेक वर्षापासून ब्रेवेट सायकल स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार्‍या वाशीम रँडोनिअर ग्रुपच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी सलग ६०० किलोमिटरची व ४० तासांची ब्रेवेट सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. मोहीमेमध्ये वाशीमसह अमरावती, यवतमाळ, दिग्रस, घाटंजी  व वरुड येथून ३ महिलांसह २६ सायकलप्रेमींनी सहभाग घेतला.
  स्पर्धेचा प्रारंभ स्थानिक पाटणी चौक येथे सकाळी ४ वाजता एपीआय अलका गायकवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर सायकलपटुंनी वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, वरुड, पांढुरणा (मध्यप्रदेश) व परत वाशिम असा ६०० किलोमिटरचा साहसिक प्रवास अत्यंत जिद्दीने पुर्ण केला. मार्गात या मोहीमेचे आयोजक चेतन शर्मा यांचा वाढदिवस अमरावतीचे सायकल ग्रुपचे आधारस्तंभ कुलकर्णी, डीसीसी विक्रम साळी, गट्टाणी, देशमुख यांच्यावतीने केक कापुन साजरा करण्यात आला. मोहीमेत २६ पैकी १३ सायकलप्रेमींनी निर्धारीत वेळेत ही मोहीम पुर्ण केली. सलग ४० तासांच्या या मोहीमेची समाप्ती १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता शर्मा पेट्रोल पंपाजवळ झाली. यावेळी वाशिम राँदीनियर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सायकलस्वारांचे उत्साहात स्वागत केले. मोहीमेत अमरावती येथून  देव भोजे, विनोदसिंग चौहान, डॉ. अंजली देशमुख, श्रीराम व अमिता देशपांडे, विजय धुर्वे, अतुल दिवाण, अर्णव हिवराळे, ऋषीकेश इंगोले, विवेक इंगोले, प्रविण खंडपासोले, महेश मेश्राम, राधा राजे, विनोद वानखेडे, सागर धानोदकर, यवतमाळ येथून विशाल इहारे, डॉ. महेश मानवर, प्रफुल भूपता, डॉ. हर्षल झोपाटे, वरुड येथून पियुष खंडेलवाल, आदित्य उपसे, पराग भोंडे, वाशिम येथून लेखाधिकारी युसूफ शेख, नारायणराव ढोबळे, दिग्रस येथून सदानंद देशमुख, घाटंजी येथून श्रीकृष्ण सोडगिर यांनी सहभाग घेतला. मोहीमेत परत येतांना व जातांना अमरावती ग्रुपच्या वतीने सायकलस्वारांचेे स्वागत आणि चहा फराळाचे आयोजन करणयात आले होते. तसेच वरुड येथे वरुड सायकलस्वार ग्रुपकडून सुद्धा चहापाणी, फराळ व परतीच्या वेळी रामदेव बाबा मंगल कार्यालय येथे आरामासाठी उत्तम सोय करण्यात आली होती. मोहीमेदरम्यान मार्गात ठिकठिकाणी सायकलस्वारांना चेतन शर्मा यांनी मदत पुरविली. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी निरज चारोळे, पवन शर्मा, विशाल ठाकूर, दिनेश इंगोले यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

0 Response to "सहाशे किलोमिटरची ब्रेवेट सायकल मोहीम यशस्वी पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना सायकलस्वारांची श्रध्दांजली"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article