दुबळवेल येथे नवरात्र उत्सव महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो
साप्ताहिक सागर आदित्य
कुलस्वामिनी
महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ग्राम दुबळवेल येथे मॉ जगदंबा देवी सेवा समिती ट्रस्ट दुबळवेल ता.मालेगाव जि.वाशिम र.नं ई 369 वा व्दारा संचालित श्री.भवानी देवी संस्थान ,दुबळवेल येथे नवरात्र उत्सव महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो ग्राम दुबळवेल येथे मागील १५० वर्षापासून नवरात्र महोत्सव हा कार्यक्रम साजरा केला जातो आई भवानी/ जगदंबा देवी चे मंदिर हे गावाचे पुर्वी दिशेला ६०० मिटर अंतरावर उंच टेकडीवर निसर्गरम्य ठिकाणी आहे गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे कुलस्वामिनी हे आराध्य दैवत आहे भक्तांचे संकटाला धावुन येणारी आहे. त्यानिमित्ताने गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त ४० ते ५० आश्विन शुद्ध प्रतिपदेपासुन ते विजयादशमी दसरा पर्यंत १० दिवस दिवस रात्र मंदिरावरच असतात हे ४० ते ५० लोक निरहार उपवास करतात. नवमीच्या दिवशी मोठा होम हवन होतो आणि दर दिवशी सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळी च्या वतीने भजन, किर्तन या सर्व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. या सर्व कार्यक्रमाला लांबून लांबुन लोक येतात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे फराळाची व चहापाणी ची व्यवस्था हि गावकरी मंडळी च्या वतीने करण्यात येते आणि नवमीच्या दिवशी भव्य किर्तनाच व महाप्रसाद होतो. या महाप्रसादाकरीता पंचक्रोशीतील भाविक भक्त हजारोंच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतात व दर दिवशी देवीची आरती सकाळी ८ वाजता व संध्याकाळी ५ वा करण्यात येते या आरती करीता गावातील लहान थोर व महिला भगिनी शेकडो च्या संख्येने आरती करीता उपस्थित असतात.
0 Response to "दुबळवेल येथे नवरात्र उत्सव महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो "
Post a Comment