
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा संपन्न आचार संहितेपुर्वी कामे पूर्ण करा: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा संपन्न
आचार संहितेपुर्वी कामे पूर्ण करा: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी बांधकाम विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेऊन निवडणूक आचार संहितेपूर्वी विभागांतर्गत जास्तीत जास्त कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात याबाबत (दि. 10) आढावा सभेचे आयोजन केले होते. सभेला जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुसकर, लेखाधिकारी सु. ब. जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीही याबाबत संबंधित यंत्रणेला याबाबत सुचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणींबाबतही त्यांच्याशी संवाद साधला. कोणत्याही कामाला विलंब न लावता नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बांधकाम विभागांतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देऊन मार्चपुर्वी निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले.
---***---
राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा संपन्न आचार संहितेपुर्वी कामे पूर्ण करा: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे"
Post a Comment