
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे’साठी नोंदणीची अंतिम तारीख
साप्ताहिक सागर आदित्य
राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे’साठी नोंदणीची अंतिम तारीख १५ सप्टेंबर असून या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेलवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी. अधिक माहिती व अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org वर उपलब्ध आहे.
0 Response to "सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे’साठी नोंदणीची अंतिम तारीख"
Post a Comment