-->

ग्रामपंचायती मालामाल होणार; ११ कोटींचा निधी मिळणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनाही निधी मंजूर

ग्रामपंचायती मालामाल होणार; ११ कोटींचा निधी मिळणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनाही निधी मंजूर


साप्ताहिक सागर आदित्य/

ग्रामपंचायती मालामाल होणार; ११ 

कोटींचा निधी मिळणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनाही निधी मंजूर

वाशिम, पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या स्वरूपातील पहिल्या हप्त्याचे वितरण राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४८९ ग्रामपंचायतींना ११ कोटी १६ लाख ५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीलादेखील निधी वितरित करण्यात आला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत पंचायत संस्थांना जिल्हा परिषद, पंचायत समितींना १० टक्के व ग्रामपंचायतीला ८० टक्के निधी उपलब्ध केला जातो. 

एका आर्थिक वर्षात बंधित आणि अबंधित स्वरूपाचा निधी मंजूर केला जातो. गाव विकास आराखड्यात समावेश असलेल्या कामावर हा निधी खर्च करावा लागतो. शिवाय आवश्यकतेनुसार ग्रामसभा आणि ग्रामपंचायतच्या मान्यतेने कामे घेता येतात. ज्या ठिकाणी प्रशासक आहे, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्यात आला नाही. वाशीम जिल्ह्यात यापूर्वी दोन ग्रामपंचायतींवर प्रशासक होतो. तेथे आता निवडणूक झाल्याने त्या दोन ग्रामपंचायतींनादेखील यापूर्वीचा बंधित हप्ता मिळाला आहे. मात्र, अबंधितचा निधी पुढील काही दिवसांत मिळेल.  त्यामुळे ४९१ पैकी ४८९ ग्रामपंचायतींना अबंधितचा निधी मंजूर झाला आहे. जानेवारी २०२४ पर्यंत ५० टक्के निधी खर्च करावा लागणार आहे. नसता पुढील हप्त्याचे वितरण केले जाणार नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

एकूण १४.२१ कोटींचा निधी :

जिल्ह्यातील ४८९ ग्रामपंचायतीसाठी ११ कोटी १६ लाख ५ हजार,  सहा पंचायत समित्यांसाठी १ कोटी ४३ लाख १ हजार आणि जिल्हा परिषदसाठी १ कोटी ४३ लाख ४ हजार रुपये असा एकूण १४ कोटी २१ लाख रुपयांचा अंबधित निधी प्राप्त झाला आहे.

0 Response to "ग्रामपंचायती मालामाल होणार; ११ कोटींचा निधी मिळणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनाही निधी मंजूर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article