-->

विकास कामांचा  आढावा घेतला

विकास कामांचा आढावा घेतला

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी घेतला विकास कामांचा आढावा.


जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी  वाशीम पंचायत समितीच्या विकास कामांचा  आढावा घेतला.जिल्हा  परिषदेच्या  वसंतराव सभागृहात याबाबत आढावा सभेचे आयोजन केले होते. या सभेलाजिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, पंचायत समितीचे  गट विकास अधिकारी  प्रफुल्ल तोटेवाड,  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेचे गटविकास  अधिकारी रविंद्र सोनोने, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योगचे जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद पट्टेबहादुर, खरोळा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच दिपक खडसे यांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्राम विकासाच्या सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजना, घरकुल योजना, मोदा आवास, रमाई आवास, अहिल्यादेवी आवास योजना, पाणी टंचाई, जलजिवन मिशन, स्वच्छ भारतमिशन अंतर्गत सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन, पंधरावा वित्त आयोग, एकात्मिक बाल विकास,  शिक्षण विभाग  व शालेय पोषण आहार योजना, बांधकाम विभागांतर्गत दलितवस्ती, तांडावस्ती, जनसुविधा योजना, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विषयक योजनांचा आढावा घेण्यात आला. सर्व योजनामध्ये सुरु असलेल्या कामांना गती देऊन मार्चपुर्वी ‍निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सर्व तालुक्यामध्ये आढावा सभेचे आयोजन:

गुरुवारी वाशीम पंचायत समिती आणि शुक्रवारी मंगरुळपीर पंचायत  समितीमध्ये आढावा सभा संपन्न झाल्या असुन सोमवार पासुन उर्वरीत तालुक्यामध्ये ‍जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभेचे नियोजन करण्यात आले आहे.


0 Response to "विकास कामांचा आढावा घेतला"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article