
पेट्रोल ९.५०, डिझेल ७ रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारकडून मोठा दिलासा
साप्ताहिक सागर आदित्य/
पेट्रोल ९.५०, डिझेल ७ रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारकडून मोठा दिलासा
उज्ज्वला याेजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर
नवी दिल्ली : इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घाेषणा केली. तसेच उज्ज्वला याेजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात जाहीर केली. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक व स्टीलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे. तर काही स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे. सिमेंटच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी मालवाहतुकीत सुधारणा करण्यात येतील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यामध्ये पेट्राेल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११० डाॅलर्स प्रति बॅरलवर पाेहाेचले आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीही देशभरात १ हजार रुपये प्रति सिलिंडरवर गेल्या आहेत. याशिवाय सरकारने सीएनजीच्या किमतीमध्येही वर्षभरात माेठी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्य जनतेचे बजेट पूर्णपणे काेलमडले हाेते.
0 Response to "पेट्रोल ९.५०, डिझेल ७ रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारकडून मोठा दिलासा"
Post a Comment