
ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षणासाठी समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत नागरिकांची मते जाणून घेणार
साप्ताहिक सागर आदित्य/
ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षणासाठी समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत नागरिकांची मते जाणून घेणार
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती आणि शहरातील नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी. व्हिजेएनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणाकरीता नागरीकांची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाचा 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 या वेळेत भेटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
0 Response to "ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षणासाठी समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत नागरिकांची मते जाणून घेणार"
Post a Comment