-->

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित


वाशिम, सर्वोत्कृष्ट क्रीडापटू व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाच्या प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारसाठी 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्काराकरीता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक,खेळाडू,साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या  https://soprts.maharastra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रॉलिंग लिंक (Scorling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत रात्री 12 वाजतापर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

                      

0 Response to "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article