-->

विकास कामे वेळेत पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा           विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय

विकास कामे वेळेत पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विकास कामे वेळेत पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

         विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय 


कारंजा येथे विकास कामांचा आढावा


वाशिम   विविध योजनांमधून करण्यात येणारी  विकास कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करतांना लोककल्याणकारी योजनांची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करा.असे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त डॉ निधी पाण्डेय यांनी दिले.    

                आज 23 ऑगस्ट रोजी कारंजा पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय यंत्रणांकडून विविध योजनांचा आढावा घेतांना आयोजित सभेत त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर,उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, उपजिल्हाधिकारी(रोहयो) कैलास देवरे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे,तहसिलदार कुणाल झाल्टे व गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

                सभेत विभागीय आयुक्त डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार,जल जीवन मिशन व अन्य शासकीय योजनांच्या कामाचा आढावा घेतला.या सभेला उपस्थित  विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाशी संबंधित विकास कामांची माहिती यावेळी दिली.

            मंजूर आणि पूर्ण झालेली तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती विभागीय आयुक्त डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली.तत्पूर्वी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन विभागीय आयुक्त डॉ.पाण्डेय यांचे स्वागत करण्यात आले.दरम्यान विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन एम.बी.बी.एस.साठी पात्र झाल्याबद्दल कारंजा येथील सादिया कासम नौरंगाबादी या दिव्यांग विद्यार्थिनीचा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी  यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सादियाचे वडील कासम नौरंगाबादी यांनाही सन्मानित करण्यात आले.

              या आढावा सभेला विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "विकास कामे वेळेत पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article