नारायणा किड्स मध्ये मोठ्या थाटामाटात ताना ताना पोळा साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
नारायणा किड्स मध्ये मोठ्या थाटामाटात ताना ताना पोळा साजरा
🐂आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया रावळा,🎈 नारायणा किड्स मध्ये मोठ्या थाटामाटात ताना ताना पोळा साजरा करण्यात आला शेतकरी बांधवांचा जिवाभावाचा सोबती म्हणजे बैल. हिंदू परंपरेनुसार आषाढ , श्रावण , आणि भाद्रपद महिन्यात पोळा साजरा केला जातो. असाच बैलपोळा कार्यक्रम नारायणाच्या चिमुकल्याण समवेत साजरा करण्यात आला. तसेच नारायणा किड्स चे चिमुकले शेतकऱ्यांच्या वेशभूषेत येऊन बैलपोळा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या दिवशी मातृदिन सुद्धा असतो त्यामुळे पोळा ॲक्टिव्हिटी सोबतच आपल्या आई बद्दल नर्सरी ते यू के जी च्याप्रत्येक विद्यार्थ्याने दोन शब्द बोलुन आई प्रती आपलं प्रेम व्यक्त केलं
याप्रसंगी नारायणा किड्स चे अध्यक्ष अनिल धुमकेकर सर, सौ आरती मॅडम, यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर मॅडम, मीनाक्षी सराटे मॅडम, सारिका धुमकेकर मॅडम उपस्थित होते. शाळेचे शिक्षक व शिक्षिका राणी चौधरी, पूजा पुरोहित, वैष्णवी पद्मने, रजनी ठाकरे, सोनाली भांदुर्गे, साधना राठोड, रूपाली जाधव, स्वाती सुर्वे, तसेच शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी शंतनू, उषाताई ,राधिकाताई, रेखाताई ,ज्योतीताई, यांच्या मोलाचे सहकार्य लाभले.
0 Response to "नारायणा किड्स मध्ये मोठ्या थाटामाटात ताना ताना पोळा साजरा"
Post a Comment