
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
साप्ताहिक सागर आदित्य
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
वाशिम: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बोहरपी, संशोधन केंद्र प्रमुख डॉ. एस. टी. राठोड, डॉ. शीतल उजाडे, प्रा. वर्षा इंगळे, डॉ. पूर्णिमा संधानी, प्रा. उद्धव जमधाडे, प्रा. अशोक वाघ (जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना), प्रा. उद्धव बनकर (आयएक्यूसी समन्वयक), प्रा. राजेश इंगोले (क्षेत्रकार्य समन्वयक), प्रा. अश्विन काकडे यांच्यासह भास्कर पट्टेबाद्दुर, जगदीश कांबळे, नितीन तनमने, रवी केदळे, दिगंबर वाघ, विठ्ठल मोहळे आणि सागर मडके यांनी उपस्थित राहून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारक कार्यावर प्रकाश टाकत, त्यांच्या शिक्षण व स्त्रीसक्षमीकरण क्षेत्रातील अमूल्य योगदानाची आठवण करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
0 Response to "क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन"
Post a Comment