
प्रा.गुलाब चतुरामाई श्रीपत साबळे हे राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित..
साप्ताहिक सागर आदित्य
प्रा.गुलाब चतुरामाई श्रीपत साबळे हे राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित.. रिसोड तालुक्यातील गोभणी गावचे सुपुत्र आयुष्यमान प्रा.गुलाब चतुरामाई श्रीपत साबळे यांना शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, साहित्य व पत्रकरिता, विद्यार्थ्यांना व गरजुवंतांना मदत,अनेक बेरोजगारांना रोजगार आदि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समर्थ फाउंडेशन ठाणे व एज्युरीक हब ठाणे - मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार 2025 . एम.एच.कॉलेज, ठाणे येथे दिनांक 9 मार्च 2025 रविवारला मोठ्या थाटात संपन्न झाला. ज्यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला निमंत्रक ऍड. प्रकाश हरताळकर(माजी न्यायधीश मुंबई), ऍड. केंसर अन्सारी (वरिष्ठ वकील व कायदेतज्ञ ठाणे) , प्राचार्य डॉ. दीपक साबळे अध्यक्ष व संस्थापक समर्थ फाउंडेशन ठाणे) व एज्यूरीक हब अध्यक्षा व लेखिका ऍड प्रा.सुनिताताई दीपक साबळे, इत्यादी मान्यराच्या हस्ते राज्यस्तरीय समाज भूषण सन्मान पुरस्कार 2025 या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक, धम्म कार्याची पावती म्हणून प्रा. गुलाब श्रीपत साबळे सरांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आत्तापर्यंत जवळपास 30 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आदर्श प्राध्यापक पुरस्कार, भारतीय राष्ट्रीय गुणवंत पुरस्कार, लोककला साधना गौरव सन्मान पुरस्कार, श्री.साईबाबा साधना गौरव पुरस्कार, कोल्हापुरी बाणा आदर्श शिक्षण भूषण राष्ट्रीय पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, राष्ट्रीय जनसेवा लोक गौरव सन्मान पुरस्कार, श्री.शनि देव कृपा गौरव राष्ट्रीय पुरस्कार ,राजीव गांधी राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार, राष्ट्रीय कर्तव्य संस्कार पुरस्कार ,समाजसेवा राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार, नेताजी सुभाष चंद्रबोस स्मृती गौरव पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श प्राध्यापक शिक्षण गौरव पुरस्कार ,राज्यस्तरीय मानव सेवा शिक्षण युवा गौरव पुरस्कार . भारतीय राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार , राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राजभाषा मराठी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार , विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार .भीम रत्न राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2024 , राष्ट्रीय धम्म संगीत पुरस्कार 2024, राजश्री शाहू महाराज आदर्श प्राध्यापक पुरस्कार कोल्हापूर, आदर्श समाज रत्न पुरस्कार2025 शेगाव, व नुकताच मिळालेला राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार 2025मुंबई या सन्मानाच्या पुरस्काराने शाल, फेटा ,सन्मानपत्र, आकर्षक ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आलेल्या सत्कारमूर्तींचां चहा, नाश्ता देऊन यथोचित मानसन्मान केला.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कायदे तज्ञ, लेखिका ,प्रा.सुनिता ताई दीपक साबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
0 Response to " प्रा.गुलाब चतुरामाई श्रीपत साबळे हे राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित.. "
Post a Comment