
भा.मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भा.मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा
रिसोड तालुक्यातील एकमेव उपक्रमशील मुलींचे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 8 मार्च शनिवारला जागतिक महिला दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या कर्तव्यदक्ष सन्माननीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम हया होत्या. प्रथमतः विचार पिठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्या सह सर्व शिक्षकेचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा.पांडूरंग मोरे यांनी प्रास्ताविक सादर केले.या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कन्या शाळेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ला कार्यरत असलेल्या सर्व शिक्षिकेनी महिलांच्या कार्य आणि कर्तृत्वावर उजाळा देणारी आपले विचार भाषणातून व्यक्त केले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते अकरावी च्यां विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केली. काही विद्यार्थिनींनी गीताच्या माध्यमातून महिला दिनाच्या कार्याला उजाळा दिला . शेवटी अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम विचार व्यक्त करताना जागतिक महिला दिन म्हणजे भारतवर्षात नारीशक्तीचा असामान्य कर्तुत्वाची, योगदानाची उजळनीं. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या अग्रगण्य आहेत, सर्वांनी महिलांविषयी , त्यांच्या योगदानाविषयी, कर्तुत्त्वाविषयी कौतुक ,कृतज्ञता व्यक्त केल्याने महिला वर्ग सुखावला आहे. महिलांची प्रगती अशीच अविरत होत राहो अशा शुभकामना देत त्यांनी आपल्या विचारातून पूर्णविराम दिला. कार्यकर्माचे सूत्रसंचालन विजय हाराळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.ज्ञानेश्वर भुतेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेकरीता सर्व शिक्षक ,शिक्षिका,शी क्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Response to " भा.मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा "
Post a Comment