
कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येते महाराष्ट्र दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य/
कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येते महाराष्ट्र दिन साजरा
आमखेडा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित गीताई ह्युमन काईंड डेव्हलोपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय आमखेडा (अहिंसातीर्थ) ता. मालेगाव . जिल्हा: वाशिम येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आले. भारत माता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , डॉ. पंजाबराव देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम जोगदंड, प्रमुख पाऊणे म्हणून पुंडलीक जोगदंड , सुरेश जोगदंड, गजानन पाचरणे आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्तित होते. कृषि महाविद्यालय प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय प्राचार्य, पुंडलिक जोगदंड, सूरेश जोगदंड आणि गजानन पाचरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रथम वर्षातील विद्यार्थी अविनाश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रोशन बेलकेडे आणि त्यांचा समूहाने गीत सादर केले. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी भाग्यश्री राठोड यानी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले आणि प्रथम वर्षातील विद्यार्थीनी पायल बागडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम.
0 Response to "कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येते महाराष्ट्र दिन साजरा "
Post a Comment