-->

जिल्हयात रोहयोच्या 973 कामांवर 4622 मजूर  मागील दोन वर्षात 5576 कामे सेल्फवर  सक्रीय मजूरांची संख्या 78 हजार 204

जिल्हयात रोहयोच्या 973 कामांवर 4622 मजूर मागील दोन वर्षात 5576 कामे सेल्फवर सक्रीय मजूरांची संख्या 78 हजार 204

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हयात रोहयोच्या 973 कामांवर 4622 मजूर

मागील दोन वर्षात 5576 कामे सेल्फवर

सक्रीय मजूरांची संख्या 78 हजार 204

       वाशिम,  : रोजगारानिमित्त होणारे मजूरांचे स्थलांतर रोखून गांव व परिसरात रोजगार हमी योजनेतून मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हयात करण्यात येत आहे. जिल्हयात आज रोजी मग्रारोहयोच्या विविध 973 कामांवर 4 हजार 622 मजूर काम करीत आहे.

           जिल्हयातील ग्रामीण मजूरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने गाव पातळीवर नियोजन केले आहे. सन 2022-23 या वर्षात जिल्हयातील 491 ग्रामपंचायतीमध्ये 1952 कामे तर सन 2021-22 या वर्षात 3624 कामे अशी एकूण 5576 कामे सेल्फवर ठेवण्यात आली होती. कामे सेल्फवर ठेवण्यामागील उद्देश ग्रामपंचायतस्तरावर मजूरांनी कामाची मागणी करताच त्यांना कामे उपलब्ध करुन देणे हा आहे.

          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हयात सक्रीय मजूरांची संख्या 78 हजार 204 इतकी आहे. जिल्हयातील सक्रीय मजूरांना या पुढील काळात जास्तीत जास्त मजूरी मिळावी व त्यामाध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी तसेच मजूरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्याच्या दृष्टिने जिल्हयातील गटविकास अधिकारी व तालुकास्तरीय नरेगा यंत्रणेला नरेगाअंतर्गत मोठया प्रमाणात कामे सुरु करुन मजूरांना मजूरी वेळेवर देण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्हयात नरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरु होऊन सक्रीय मजूरांना मजूरी मिळेल तसेच मजूर उपस्थितीमध्ये देखील लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.  


                                                                                                                                    

Related Posts

0 Response to "जिल्हयात रोहयोच्या 973 कामांवर 4622 मजूर मागील दोन वर्षात 5576 कामे सेल्फवर सक्रीय मजूरांची संख्या 78 हजार 204"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article