
मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम ३१ जानेवारीपर्यंत होणार
साप्ताहिक सागर आदित्य
मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम ३१ जानेवारीपर्यंत होणार
प्रगणकाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांचे आवाहन
वाशिम राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम करण्यात येत आहे.राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.सर्वेक्षणाचे हे काम २३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० जानेवारी रोजी सर्वेक्षणाबाबत नागरिकांना माहिती व्हावी तसेच सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकाला प्रत्येक घरातून अचूक माहिती दयावी असे आवाहन केले आहे.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली आहे.हे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षण कालावधीत घरी उपस्थित राहून सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.
0 Response to "मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम ३१ जानेवारीपर्यंत होणार"
Post a Comment