-->

मराठा आरक्षण हा आमचा अधिकार  काटा येथे सकल मराठा समाजाच्यावतीने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा

मराठा आरक्षण हा आमचा अधिकार काटा येथे सकल मराठा समाजाच्यावतीने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मराठा आरक्षण हा आमचा अधिकार  काटा येथे सकल मराठा समाजाच्यावतीने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा ५ डिसेंबर रोजी पार पडली . या सभेमध्ये जरांगे पाटीलांनी पुन्हा भुजबळांना लक्ष्य करीत एकीरी भाषा वापरत हल्लाबोल केला . आरक्षण हा आमचा अधिकार आहे . ते आरक्षण आम्ही मराठा मिळविणारच अशी गर्जना करीत मंत्री भुजबळ हे राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आवरावे असे यांनी त्यांना आवाहन केले . मार्गाने शांततेच्या मराठा समाजाने आंदोलन करून एकजुट होवून शक्ती प्रदर्शन करावे असेही सांगीतले . मराठा समाज आज जागा झाला आहे . तो एकजुट 2 होत आहे . मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हा अधिकारी असून तशा नोंदी मिळालेल्या आहेत . त्यामुळे कायदयाच्या चौकटीत आम्ही आरक्षणाची मागणी करीत आहो . भुजबळ यांनी आमच्या नांदी लागू नये असे आवाहन करीत त्यांचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला . प्रत्येक 13 गावात गरीब मराठा व गरीब ओबीसी एकमेकाच्या सुखदुखात प्रथम धावतात . हे भुजबळ यांना बघवीत नाही असा आरोप त्यांनी केला . भुजबळांवर अनेक गंभीर आरोप त्यांनी केले . आमचे पोस्टर पाडल्या जात आहेत मात्र आगामी काळात आम्ही त्यांचे पोष्टर मराठा समाज पाडेल असे सांगीतले . २४ डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . आतापर्यंत ३५ लाख मराठयाना आरक्षण मिळाले ही आपली उपलब्धी असल्याचे सांगीतले . सरकारनेही मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी असे सांगत एका मंत्रीच्या नांदी लागू नका जर मंत्र्याच्या सांगण्यावरून मराठयावर अन्याय झाला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा ही दिला . एक मराठा लाख मराठा अशी गर्जना करीत मराठा आरक्षणासाठी आपले प्राण गेले तरी आपण मागे हटणार नसल्याचे सांगीतले . सभेला मोठया संख्येने मराठा बाधंव उपस्थित होते .

0 Response to "मराठा आरक्षण हा आमचा अधिकार काटा येथे सकल मराठा समाजाच्यावतीने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article