
शिरपुरमध्ये ४.५८ कोटींच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन
साप्ताहिक सागर आदित्य/
शिरपुरमध्ये ४.५८ कोटींच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन
शिरपूर : येथे १९ जानेवारी रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्या हस्ते ४ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शिरपूर बस स्थानक परिसरात पार पडला. त्यावेळी जाहिर सभेत बोलत असताना त्यांनी सांगितले की, शिरपूरातील तरुणांना व्यायाम करण्यासाठी ट्रेक मंजूर करून घेण्यात आला, स्मशानभूमीत, कब्रस्थानात हायमास्ट लाईट ची व्यवस्था करण्यात येईल. तसेच धनगर समाजाला सभागृह उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य डॉ. शाम गाभणे हे होते. दिलीपराव जाधव (संचालक), जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, वैभव सरनाईक सभापती गणेश उंडाळ, रंजनाताई मधुकर काळे, सभापती पंचायत समिती मालेगाव, सलीम परसुवाले, रिसोड मालेगांव विधान सभा प्रमुख अशोक अंभोरे, दामोदर सारडा, माजी सरपंच गणेश भालेराव, संचालक कृउबास राजू पाटील इंगोले, पं.स सदस्य शकील खान, इमरान परसुवाले, सलीम रेघीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. शिरपूर शहर काँग्रेस अध्यक्ष नंदकिशोर गोरे व जय हो बळीराजा मित्र मंडळ, शिरपूर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
0 Response to "शिरपुरमध्ये ४.५८ कोटींच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन"
Post a Comment