
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे गणित शिक्षक अनंत खडसे यांना सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे गणित शिक्षक अनंत खडसे यांना सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले असता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर स्मारक अल्पसंख्याक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव भगत साहेब प्रमुख अतिथी संस्थे चे सचिव मधुकरराव भगत साहेब, माजी मुख्याध्यापिका विजया खडसे होते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर प्रास्ताविक वैशाली चातुरकर यांनी केले तर अध्यक्षपदावरून बोलत असताना भगत साहेब यांनी सत्कारमुर्ती अनंत खडसे यांनी 36 वर्ष शिक्षक म्हणून विद्या दानाचे कार्य करुन शाळेच्या उन्नती करीता प्रामाणिक पणे कार्य करीत असताना गणित विषयाच्या जादा तासिका घेऊन विद्यार्थ्यांना आपला विषय कसा सहज आणि सोपा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या शिक्षक रुपी कार्य चे योगदान शाळेला निश्चित यशाचे शिखर गाठण्यात मदत झाली असून त्यांचा सपत्नी सत्कार करुन सन्मान प्रमाण प्रत्र देउन गौरविण्यात आले असता सत्कार मुर्ती अनंत खडसे गणित शिक्षक यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना शिक्षकी पेशातुन मी माझे केलेले अधयापणाचे कार्य हे माझी ड्युटी होती माझे ते करतवये होते नेहमीच प्रतेक शिक्षकाने आपल्या विद्यालय चे सुयश चिंतीत करावे तसे कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन केले आपल्या भावनिक भाषणात प्रेरणादायी वास्तूला नमन करुण आपणा सर्वांचे मनापासून आभार मानून निरोप घेत आहे तर शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी खडसे सरांच्या अष्टपैलू कामगिरी बद्दल गौरव ऊदगार, व त्यांच्या भावी आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या तर ईयता नववीच्या मुली यांनी स्वागत गित,, निरोपाचे सुमधूर गित गात वातावरण भावणिक करुण सर्व उपस्थित यांचे मने जिंकून वातावरण निर्माण केले कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक प्रसेन भगत, शिक्षक विकलसिंग राठोड, चंद्रशेखर वानखडे, सतिश भगत, रुपेश जयस्वाल, निलेश उजवे, सुरेश पारधी, वैशाली चातुरकर, सविता भालेराव, ज्योती इंगोले, विजयश्री सरनाईक, तेजस्विनी इंगळे ईत्यादी ना केले तर सूत्रसंचालन ज्योती इंगोले यांनी आपल्या सुमधूर आवाजात तर आभार विजयश्री सरनाईक यांनी केले कार्यक्रमाला शाळेचे माजी सर्व कर्मचारी उपस्थित होते
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे गणित शिक्षक अनंत खडसे यांना सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमाचे आयोजन"
Post a Comment