
स्व. शांताताई शिंदे यांच्या जयंती निमित्त गौरी शंकर विद्यालयात वाशिम येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..
साप्ताहिक सागर आदित्य
स्व. शांताताई शिंदे यांच्या जयंती निमित्त गौरी शंकर विद्यालयात वाशिम येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..
वाशिम :-शिंदे गुरुजी प्रसारक मंडळ, वार्ला तथा शांतीनिकेतन महिला विकास समिती वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी शंकर विद्यालय नालंदा नगर वाशिम येथे दि. 1 एप्रिल 2025 रोजी शांताताई शिंदे( मा.जि.शिक्षण अधिकारी ) यांच्या 81 व्या जयंती च्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भव्य रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले सदर शिबरामध्ये 61 रक्तदात्यानी रक्तदान दिले,
अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघांचे आमदार ऍड.किरणराव जी सरनाईक यांची उदघाट्क म्हणून उपस्थिती लाभली, तर अध्यक्षस्थानी विजयराव शिंदे सर यांची उपस्थिती लाभली, उदघाटक ऍड. किरणराव सरनाईक यांनी रक्तदान केल्याने गरजू व्यक्तींचे जीव वाचविल्या जावू शकतो, रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे, ते प्रत्येकानी केले पाहिजे, रक्तदानाचे मानवी जीवनात असलेले महत्व सांगितले, यावेळी अनेक मान्य वरांनी स्व. शांताताई शिंदे यांच्या समाज उपयोगी कार्यावर प्रकाश टाकला, व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला,
या शिबीरामध्ये जिल्हातील सामाजिक राजकीय चळवतील मंडळींनी रक्तदान देऊन कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्यांचसोबत समाजकारणात सक्रिय असलेल्या सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील नवंतरुणांनी देखील रक्तदान देऊन सहभाग नोंदविला, यावेळी
राजेंद्र शिंदे ( मा.शिक्षण अधिकारी जि. प. वाशिम ) आकाशजी आव्हाळे ( शिक्षणअधिकारी जि. प. वाशिम ) महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशन समितीच्या अध्यक्ष सौ.वैशाली ताई आरु, श्रीमती करुणाताई कल्ले, संस्थेचे सचिव संजय शिंदे सर, बाळासाहेब गोरे, सतीश शेवदा( न. प. मुख्याधिकारी रिसोड) ज्ञानेश्वर वाघ, डॉ. विजयराव नाले, डॉ. कव्हर, डॉ. सदार, डॉ. बकाल, डॉ. बोरकर, डॉ. परमानंद मुसळे, डॉ. इंगळे, नानाभाऊ देशमुख, डॉ. ढोबळे सर, डॉ. पोफळे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाला जिल्हा रक्तसंकलन अधिकारी डॉ. हरिदास बिलाई, जनसंपर्क अधिकारी सचिन दंडे , रक्तपेढी सहाय्यक सिद्ध विनायक स्वामी, गणेश वैद्य, प्रियंका सावंत, सुनील सावके शासकीय रक्तपेढी वाशिम संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती,
0 Response to "स्व. शांताताई शिंदे यांच्या जयंती निमित्त गौरी शंकर विद्यालयात वाशिम येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.."
Post a Comment