
बणजारा विरासत वास्तू ठरणार पर्यटकांसाठी आकर्षण रामनवमीच्या पर्वावर ५ एप्रिलपासून सर्वांसाठी खुले
पर्यटनाच्या नकाशावर पोहरादेवी !
साप्ताहिक सागर आदित्य
बणजारा विरासत वास्तू ठरणार पर्यटकांसाठी आकर्षण
रामनवमीच्या पर्वावर ५ एप्रिलपासून सर्वांसाठी खुले
वाशिम, मानोरा
तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजाची संस्कृतीचे संवर्धन होऊन तिचे दर्शन सर्वांना घडावे, याकरिता महाराष्ट्र शासनाने नंगारा आकाराची भव्यदिव्य अशी वास्तू साकारली आहे. ज्यामध्ये बंजारा समाजाचा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिप्रेक्षातून बहुआयामी असा वारसा देखावे, चलचित्र आणि संगीताच्या संयोजनातून डोळ्यासमोर उभा केला आहे. ज्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी गतवर्षी केले होते. परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे तो सामान्य नागरिकांकरिता खुला करण्यात आला नव्हता. आता रामनवमीच्या पावन पर्वावर दि. ५ एप्रिल पासून ही वास्तू सर्वसामान्य नागरिकांकरिता खुली करण्यात येणार आहे.
'बणजारा विरासत' या म्युझियमची संपूर्ण पाहणी करण्यासाठी जवळपास दोन तासांचा अवधी लागतो. प्रत्येक दर्शकाला ऑडिओ गाईड म्हणून हेडफोन देण्यात येणार आहे. ज्यामध्ये पर्यटक ज्या देखाव्यासमोर उभा आहे, त्या देखाव्याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे.
बंजारा शब्दाची उत्पत्ती, बंजारा समाजाचे ऐतिहासिक संदर्भ, बंजारा समाजातील न्यायव्यवस्था, धार्मिक अधिष्ठान, पेहराव, राजकीय परंपरा याचे दर्शन वेगवेगळ्या गॅलरी मधून घडते. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि शीख यांच्या देखाव्यातून धार्मिक सलोख्याबाबतचे वास्तव चित्रण स्पष्ट होते.
0 Response to "बणजारा विरासत वास्तू ठरणार पर्यटकांसाठी आकर्षण रामनवमीच्या पर्वावर ५ एप्रिलपासून सर्वांसाठी खुले"
Post a Comment