
सुरक्षेच्या उपाययोजनांनंतर संग्रहालय जनतेसाठी खुले
साप्ताहिक सागर आदित्य
सुरक्षेच्या उपाययोजनांनंतर संग्रहालय जनतेसाठी खुले
वाशिम,५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या संग्रहालयास सुरक्षेच्या कारणास्तव एसपीजी कडून पूर्णपणे मॅन्युअल पद्धतीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार संपूर्ण म्युझियमची ऑटोमॅटिक प्रणाली तात्पुरती थांबवून मॅन्युअल पद्धतीने चालवण्यात आली होती.
यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण प्रणालीचे ऑटोमॅटिक प्रोग्रामिंग करून ती सुरळीत कार्यान्वित करण्यात आली. याच कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी निविदा प्रक्रिया सुरु करणे शक्य झाले नाही.
तथापि, सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करून संग्रहालय फेब्रुवारी २०२५ मध्ये नागरिकांसाठी विनामूल्य खुले करण्यात आले. त्यानंतर दोन महिने संग्रहालयाची कार्यप्रणाली ट्रायलच्या माध्यमातून चाचपणी करून अधिक कार्यक्षम करण्यात आली.
हा विलंब हा पूर्णतः सुरक्षेच्या गरजा व तांत्रिक समायोजनामुळे झाला होता, व जनतेसाठी अधिक सुरक्षित आणि अनुभवसमृद्ध संग्रहालय उभे करण्यासाठी हे पावले उचलण्यात आली होती.अशी माहिती कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिली आहे.
0 Response to "सुरक्षेच्या उपाययोजनांनंतर संग्रहालय जनतेसाठी खुले"
Post a Comment