
केकतउमरा येथे महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त संदीपपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
केकतउमरा येथे महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त संदीपपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
केकतउमरा: क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची १९८ वी
जयंती केकतउमरा येथे साजरी होत आहे. यानिमित्त महात्मा जोतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने ११ एप्रिल रोजी अभिवादन व सायं.७:०० वाजता संदीपपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे.
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत,स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणारे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई या दाम्पत्याने समस्त भारतवासीयांसाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाचे द्वारे खुली केली. त्यांच्या कार्याचा जागर होण्यासाठी जयंतीनिमित्त प्रबोधनाचा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ११ एप्रिल रोजी सायं.७ ते १० वेळेत ग्रामपंचायत कार्यालय समोर ,केकत उमरा येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर आणि कार्यावर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे.प्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे परम शिष्य संदीपपाल महाराज यांची *सतर्क वाणी* हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अगोदर गावातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस अभिवादन करण्यात येईल.नंतर कार्यक्रमास सुरवात होईल.तरी सर्व जाती-धर्माच्या समाजबांधवांनी व गावकरी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीकडून करण्यात आले.
0 Response to "केकतउमरा येथे महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त संदीपपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम"
Post a Comment