-->

ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान

ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान

 मुंबई,दि.6(रानिआ) राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती, राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.  

            निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.

                    

Related Posts

0 Response to "ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article