
अधिवेशनात संघटनेच्या ध्येयधोरणावर होणार मंथन
साप्ताहिक सागर आदित्य
अधिवेशनात संघटनेच्या ध्येयधोरणावर होणार मंथन
विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटिक; ‘हॉईस आॅफ मीडिया’ची आढावा बैठक
वाशीम : आागामी १६ एप्रिल रोजी नागपूर येथे होवू घातलेल्या ‘हॉईस आॅफ मीडिया’च्या विभागीय अधिवेशनात संघटनेच्या ध्येयधोरणावर विचार मंथन होणार असल्याची माहिती संघटनेचे विदर्भ विभागीय मंगेश खाटिक यांनी दिली़ या अधिवेशनाचा आढावा घेण्यासाठी स्थानिक विश्रामभवन येथे ७ मार्च रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते़ याप्रसंगी राज्यप्रमुख सामाजिक उपक्रम तथा जिल्हाध्यक्ष नागपूर आनंद आंबेकर, वाशीमचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांची उपस्थिती होती़
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले़ यानंतर दिवंगत जेष्ठ पत्रकार गजानन भोयर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली़ याप्रसंगी आनंद आंबेकर यांनी अधिवेशनाचीतयारी व नियोजनाबाबत विस्तृत माहिती दिली़ सोबतच शासन, प्रशासन व समाजाकडून दुर्लक्षिल्या जात असलेला पत्रकार व त्याच्या कुटुंबियांच्या उज्ज्वल भविष्याबात संघटना राबवित असलेल्या उपक्रमांबाबत सांगून अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले़ याप्रसंगी मंगेश खाटीक यांनी नागपूर येथे होणाºया विदर्भ स्तरीय अधिवेशनात पत्रकारांना भेडसावणाºया विविध समस्यांवर सांगोपाग चर्चा करण्यात येणार असून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे सांगीतले़ शिवाय या अधिवेशास संघटनेचे राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहून मार्गदशन करणार असल्याने या संधीचा लाभ विदर्भातील जास्तीत जास्त पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन केले़ कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा़ राम धनगर यांनी केले.
0 Response to "अधिवेशनात संघटनेच्या ध्येयधोरणावर होणार मंथन "
Post a Comment