-->

‘आप’च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : तारांगणाला लागलेल्या आगीच्या चौकशीची मागणी

‘आप’च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : तारांगणाला लागलेल्या आगीच्या चौकशीची मागणी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी ‘नाट्यगृह’ तरी सुरू करा!


‘आप’च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : तारांगणाला लागलेल्या आगीच्या चौकशीची मागणी


वाशिम – कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने हक्काचे व्यासपीठ असावे, म्हणून कलावंतांना गेल्या कित्येक दशकांपासून मागणी करावी लागली. त्यानंतर नगर परिषदेने नवीन नाट्यगृह उभारले. मात्र, हे नवीन नाट्यगृह अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यातच मंगळवारी (दि.26) करोडो रुपये खर्चुन बांधलेली तारांगणाची वास्तू भर पावसात जळून खाक झाली. हे वास्तव डोळ्यासमोर ठेवून तथा आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी वाशिम नगर परिषदेने नवीन बांधलेले नाट्यगृह तातडीने सुरू करावे, तसेच तारांगणाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘आप’चे राम पाटील डोरले यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

वाशिम नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, कलावंतांच्या कला-गुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने नाट्यगृह असणे खूप गरजेचे आहे. याबाबत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीमुळे वाशिम नगर परिषदेने नवीन नाट्यगृह उभारले. मात्र, हे नाट्यगृह अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे नाट्यगृह केवळ एकप्रकारे शोभेची वास्तू म्हणून उभे आहे. त्यातच मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) सकाळी नगर परिषदेने करोडो रुपये खर्चुन बांधलेल्या तारांगणाला भर पावसात आग लागून भस्मसात झाले. त्यामुळे ही वास्तू जनतेच्या सेवेत येण्यापूर्वीच जळून खाक झाली. ही घटना डोळ्यासमोर ठेवून, वाशिम नगर परिषदेने लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या नाट्यगृह तरी तातडीने सुरू करावे. अन्यथा या नवीन नाट्यगृहाच्या इमारतीला देखील आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही स्थिती पाहता नगर परिषदेच्या तारांगणाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात यावी, आणि नवीन नाट्यगृहाचे तातडीने लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी ‘आप’चे राम पाटील डोरले यांच्या मार्गदर्शनात संघपाल कांबळे, रामदास जाधव, जितेंद्र कांबळे यांनी वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

......

वाशिम नगर परिषद पूर्णतः भ्रष्टाचाराने बरबरटलेली आहे. याबाबत मी टेम्पल गार्डन, तारांगण, भूमिगत ड्रेनेज लाइन, रस्त्यावर पडलेले खड्डे, नगर परिषदेच्या जागांवर झालेले पक्के अतिक्रमण, राजकीय पुढाऱ्यांच्या खासगी ले-आऊटमध्ये केलेली रस्त्याची कामे आदी कित्येक विषयांवर मी आवाज उठवला आहे. हा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भर पावसात तारांगणाला आग लागू शकते. त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी तरी लाखो रुपये खर्चुन उभारलेले नाट्यगृह सुरू व्हावी, ही आपली माफक अपेक्षा आहे. नसता, नवीन नाट्यगृह देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकते.


-राम पाटील डोरले, ‘आप’ पदाधिकारी, वाशिम 


0 Response to "‘आप’च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : तारांगणाला लागलेल्या आगीच्या चौकशीची मागणी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article