जुमडा फाटा येथे आरोग्य तपासणी शिबिर! शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपक्रम ; गोरगरिब, गरजू रुग्णांना मोफत औषधीचे वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
जुमडा फाटा येथे आरोग्य तपासणी शिबिर!
शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपक्रम ; गोरगरिब, गरजू रुग्णांना मोफत औषधीचे वितरण
वाशीम : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती महोत्सवानिमित्त तालुक्यातील जुमडा फाटा येथे परिरसरातील गोर-गरिब, गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी, रुग्णांचे समुपदेशन व गरजू रुग्णांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. यावेळी अमोल शिंदे मित्रमंडळाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिरात भेट देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुक्यातील जुमडा परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. हीच जाणीव ठेवून जुमडा फाटा येथील माऊली क्लिनीकचे डॉ. प्रभाकर शिंदे यांनी परिसरातील २०० च्यावर गोर-गरिब, गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफथ औषधीचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांना डॉ. राधेश्याम वैद्य, डॉ. गौरव सारस्कर, डॉ. सागर सदार, डॉ. श्याम आवले, डॉ. धनंजय कव्हर यांनी विविध आजारांच्या रुग्ण तपासणी करत रुग्णांचे समुपदेशन केले. या आरोग्य तपासणी शिबिराला काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे वाशीम तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राजू शिंदे, डी. एल. शिंदे, नारायण शिंदे, केशव शिंदे, डिगांबर शिंदे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष दगडू शिंदे आदींची उपस्थिती होती.
0 Response to "जुमडा फाटा येथे आरोग्य तपासणी शिबिर! शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपक्रम ; गोरगरिब, गरजू रुग्णांना मोफत औषधीचे वितरण"
Post a Comment