शस्त्रक्रिया मोहिम / १९ फेब्रुवारी विशेष मोतिबींदु शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
शस्त्रक्रिया मोहिम / १९ फेब्रुवारी विशेष मोतिबींदु शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ
वाशिम जिल्हयामध्ये राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत केंद्र शासना मार्फत विशेष मोहिम राष्ट्रिय नेत्र ज्योती अभियान माहे जून २०२२ पासून राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकामधे अंधत्व आणि SIV कारणिभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पुर्ण पणे भरुन काढण्याचे लक्ष आहे. सदर मोहिमे अंतर्गत वाशिम जिल्हयामध्ये दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ ते ०४ मार्च २०२४ या कालावधी मध्ये मोतिबींदु शस्त्रक्रिया करण्याकरीता मोतिबींदु शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ झाला असुन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जिल्हा रुग्णालय वाशिम येथे मोफत मोतिबींदु शस्त्रक्रिया केल्या जाणार असुन जास्तीत जास्त नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अनिल कावरखे यांनी केले. तसेच आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी १९ नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सदर मोहिमे दरम्यान ग्रामीण रुग्णालय, प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र स्तरावर केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व नेत्रचिकीत्सा अधिकारी यांच्या मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येईल. या मोहिमेदरम्यान आशा, आरोग्य सेबीका, आरोग्य सेवक व समुदाय अधिकारी हे सदर शिबीराबाबत लोंकांमध्ये जनजागृती करणार आहेत. निदान झालेल्या मोतिवींदु रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, वाशिम येथे करण्यात येईल.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बालाजी
हरन, नेत्रशल्य चिकीत्सक डॉ. आशिष बेदरकर, डॉ. अविनाश पुरी, डॉ. स्मितल मेटांगे, डॉ. आश्विन
पराती, डॉ. पुजा चव्हाण, अधिपरीचारीका श्रीमती चव्हाण, नेत्रचिकीत्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे,
सुधिर साळवे, गणेश व्यवहारे, रवि घुगे, रमेश ठाकरे, ओम राउत यांचे सहकार्य लाभले.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (अंनिका)
जिल्हा रुग्णालय, वाशिम
duf जिल्हा शल्य चिकीत्सक,
जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम
0 Response to "शस्त्रक्रिया मोहिम / १९ फेब्रुवारी विशेष मोतिबींदु शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ"
Post a Comment