-->

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी  जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्याचे सूक्ष्म नियोजन करा

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्याचे सूक्ष्म नियोजन करा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी

जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्याचे सूक्ष्म नियोजन करा

       

        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

                                                      

वाशिम, 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात येत असलेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले.

           आज 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथील रिसोड रोडवरील तिरुपती लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीराच्या तयारीचा आढावा घेतांना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ,कारंजा उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे,उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सतिष शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

           श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या दिव्यांगांना अभियानाच्या शिबीरातून लाभ देण्यासाठी यंत्रणांनी काम करावे.जेणेकरुन प्रत्येक दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास मदत होईल. सर्व यंत्रणांनी सर्व दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना विविध योजनांची माहिती द्यावी आणि कोणत्या योजनांचा लाभ पाहिजे याची माहिती घ्यावी.योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडून कागदपत्रांची पुर्तता करून घ्यावी.शिबिराचे आयोजन वाशीम करण्यात आले आहे त्याबाबतची माहिती गावातील दिव्यांगाना व्हावी यासाठी दवंडी दयावी.दिव्यांगांना लाभ देण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी शिबीराच्या ठिकाणी विभागानी आपले स्टॉल लावण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

                   श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाअंतर्गत प्रत्येक विभागनिहाय किती दिव्यांग लाभार्थी येणार आहे याची माहिती संकलित करून लाभ देण्यात येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या आकडेवारी विभागांनी निश्चित करावी.लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर व्यवस्थित माहिती देणारा कर्मचारी उपस्थित ठेवावा.

                   ।श्री.वाठ यांनी  अभियानाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीराच्या तयारीची माहिती यावेळी दिली. सभेला जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुधिर फडके, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी,सर्व तहसिलदार,सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी,सर्व गटविकास अधिकारी विविध विभागाचे कार्यालय प्रमुख तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे निरीक्षक देवानंद लकडे व श्रीमती राऊत यांची उपस्थित होते.  

                     

0 Response to "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्याचे सूक्ष्म नियोजन करा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article