-->

अंजनकर ज्वेलर्स मालेगाव  सशस्त्र दरोडा  - आणखी तीन आरोपी ताब्यात

अंजनकर ज्वेलर्स मालेगाव सशस्त्र दरोडा - आणखी तीन आरोपी ताब्यात


 साप्ताहिक सागर आदित्य/

अंजनकर ज्वेलर्स मालेगाव  सशस्त्र दरोडा  - आणखी तीन आरोपी ताब्यात

  सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजबराव घुगे यास दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी  अटक केल्यानंतर  बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक   वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन मालेगाव यांचे चार वेगवेगळी पथके तयार  करून तपास कामी रवाना करण्यात आलेली होती.

          यातील दुसरा मुख्य आरोपी हसन  सलीम खाटीक,  यास मध्यरात्री धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेले असून अटक करण्यात आलेली आहे.

         तीसरा आरोपी दिनेश किरण नीरापुरे, यास अहमदाबाद  गुजरात येथून  आज सकाळी  ताब्यात घेतले असून  यामधील  चौथा आरोपी  संतोष दत्तात्रय माने,  रा. पाल, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून नुकतेच ताब्यात घेतलेले आहे.ताब्यात  घेण्यात आलेल्या आरोपींचे  प्रत्येकाचा  कशाप्रकारे सहभाग आहे  याचा तपास करून या सर्व आरोपींनी कशाप्रकारे व कोणत्या ठिकाणी कट रचून सदरचा सशस्त्र खूनी दरोडा  टाकला तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे सुद्धा कोणत्या ठिकाणावरून कोणत्या वाहनाने तसेच कोणाकडून आणले याचासुद्धा तपास करून सदर दरोड्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील असलेल्या सर्व आरोपींच्या विरुद्ध  कठोर कारवाई  करण्यात येणार आहे.

  सदर गुन्ह्याचा तपास  भामरे अपर पोलीस अधीक्षक वाशिम.  पुजारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वाशिम.  यांचे पर्यवेक्षनाखाली  जाधव,  पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वाशीम.   धुमाळ पोलीस निरीक्षक, मालेगाव. PSI जायभाय  तसेच प्रत्यक्ष पथकात  सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहनकर,  पोलीस उपनिरीक्षक पठाण,  स्थानिक गुन्हे शाखा वाशीम व पोलीस उपनिरीक्षक महल्ले मालेगाव पोलीस स्टेशन व सायबर शाखेचे पोलीस अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




0 Response to "अंजनकर ज्वेलर्स मालेगाव सशस्त्र दरोडा - आणखी तीन आरोपी ताब्यात"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article