-->

गिताज्ञान विद्या मंदिर, पांगरी नवघरे चा स्थलांतरण सोहळा.

गिताज्ञान विद्या मंदिर, पांगरी नवघरे चा स्थलांतरण सोहळा.

 


साप्ताहिक सागर आदित्य/

  पांगरी नवघरे:गिताज्ञान विद्या मंदिर, पांगरी नवघरे  चे स्थलांतरित झाले असता  स्थलांतरन  सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माननीय  गोविंद पुरोहित संचालक  अकोला अर्बन बँक  लाभले असून  प्रमुख पाहुणे  प्रकाश पाटील लहाने उपाध्यक्ष गीताज्ञान बहुद्देशीय संस्था संपादक साप्ताहिक सागर आदित्य  ,आत्माराम नवघरे अध्यक्ष ग्रामसेवक संघटना वाशिम जिल्हा,ॲड. सुभाषराव नवघरे ,सुरेश नवघरे वरिष्ठ लिपिक पंचायत समिती वाशिम, नंदकिशोर नवघरे, सौ.सुमित्राताई घोडे उपसभापती पंचायत समिती मालेगाव  प्रमोद नवघरे सभापती क्रुषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव.उपस्थीत होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन फीत कापून करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेला विद्यार्थी  अभिमन्यू सुरेश  नवघरे यांचा मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सत्कार व सत्काराला उत्तर देताना अभिमन्यू नवघरे यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी मार्मिक शब्दात उद्बोधन केले ते सांगत होते की नीट परीक्षा पास झाल्यानंतर माझे मित्र विचारत होते की तुला आईबाबांनी कोणते बक्षीस दिले त्यांनी सांगितले नर्सरी ते आजपर्यंत शिक्षण त्यांनी स्वतःच्या इच्छेला मारून त्यांनी करून मला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे तीच माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे असे सांगितले व इतर मान्यवरांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक पंडित नवघरे यांनी केले.सुत्र संचालन अमोल नवघरे यांनी केले व आभार प्रदर्शन गजानन विश्वनाथ नवघरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ मोनाली नवघरे. आदित्य नवघरे. अश्विन नवघरे सौ. दिपाली मॅडम सौ. सोनाली मॅडम. अभिजीत जाधव व गावकऱ्यांनी सहकार्य केले. 




0 Response to "गिताज्ञान विद्या मंदिर, पांगरी नवघरे चा स्थलांतरण सोहळा."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article