-->

कृषि महाविद्यालय आमखेडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी

कृषि महाविद्यालय आमखेडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी


 साप्ताहिक सागर आदित्य/

कृषि महाविद्यालय आमखेडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी


 आमखेडा: गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित, डॉ. दे. कृ. वि. अकोला संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ता. मालेगाव जि. वाशीम येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिक्षण महर्षी कृषिरत्न भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रदीप निचळ यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्र व कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाला  प्रा.अजिंक्य पिसाळ , डॉ.जी. एच. वसु, रा.से.यो. कार्यक्रम समन्वयक प्रा.एस. टी. कव्हर  प्रा. एस बी वाकूडकर  प्रा.डी.टी. बोरकर, प्रा.एस.एम.गायकवाड व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  व विद्यार्थी उपस्थित होते.




0 Response to "कृषि महाविद्यालय आमखेडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article