-->

ग्रामपंचायत निवडणूक : 4 ते 6 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रात मद्यविक्री बंद

ग्रामपंचायत निवडणूक : 4 ते 6 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रात मद्यविक्री बंद

 


साप्ताहिक सागर आदित्य 

ग्रामपंचायत निवडणूक : 4 ते 6 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रात मद्यविक्री बंद 


वाशिम,  जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणूका होवू न शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूका तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागेच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.या निवडणूकीचे 5 नोव्हेंबर रोजी मतदान व 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून व निवडणूक प्रक्रीया व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई व कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) नुसार देण्यात आलेल्या अनुज्ञप्तींना मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळण्याबाबत अनुज्ञप्तीधारकांना बंधनकारक आहे.

 मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) नुसार जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत पुढीलप्रमाणे कोरडे दिवस जाहिर केले आहे. 4 नोव्हेंबर 2023 रोजी मतदानाच्या आधीचा संपूर्ण दिवस ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका आहेत, त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मद्यविक्री बंद राहील.5 नोव्हेंब रोजी मतदानाच्या दिवशी ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक आहेत, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्री बंद राहील.6 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत ज्या तहसिल क्षेत्रात मतमोजणी होणार आहे,त्या क्षेत्रातील मद्यविक्री बंद राहील.

             मद्यविक्रीधारकांनी वरील कालावधीत व वेळेत मद्यविक्री बंद ठेवून आदेशाचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांच्या नावे असलेली अनुज्ञप्ती मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 व 56 नुसार तात्काळ रद्द करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.  

                   

0 Response to "ग्रामपंचायत निवडणूक : 4 ते 6 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रात मद्यविक्री बंद "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article