-->

कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे जागतिक योग दिन साजरा

कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे जागतिक योग दिन साजरा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे जागतिक योग दिन साजरा 

२१ जून जागतिक योगदिना निमित्त योग विद्या गुरुकुल अंतर्गत..निरामय योग केंद्र,राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन व ऑफलाईन सूर्यनमस्कार वर्ग  कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. योगासनामुळे आरोग्य निरोगी राहातं आणि हे नेहमीच मानण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मानसिक तणावात असाल तर तुम्हाला योगाचा नक्कीच फायदा करून घेता येतो. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे.

              सौ. वैशाली अहीरे ( योग शिक्षिका), डॉ. एम. सी. अहिरे ( योग शिक्षक) यांच्या मार्गदर्नाखाली डॉ. आर. एस. करंगामी यांनी सकाळी ६ ते ७:३० ला कृषि महाविद्यालय, आमखेडा च्या परीसरात योग अभ्यास विषयी मार्गदर्शन केले व त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळेस डॉ.माणिकराव जोगदंड बाबा, प्रा. एम. पि. सुरुशे , श्री किशोर जोगदंड व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि गावातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. ए. काळे व  एन. एम. काळे, जन संपर्क अधिकारी,यांचे मार्गदर्शन लाभले

Related Posts

0 Response to "कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे जागतिक योग दिन साजरा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article