
उमेद अंतर्गत स्वतंत्र प्रभाग संघाची सभा...
साप्ताहिक सागर आदित्य
उमेद अंतर्गत स्वतंत्र प्रभाग संघाची सभा...
दिनांक 16 /9/ 2022 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत आडोळी प्रभागातील स्वतंत्र प्रभाग संघाची सभा घेण्यात आली सदर सभेमध्ये सर्वप्रथम प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर सर्वांनी आपापल्या परिचय देण्यात आला. तसेच ज्या ग्राम संघांना CIF,VRF आणि START UP निधी वितरित करण्यात आला त्या ग्राम संघांना कशाप्रकारे निधी खर्च केला याविषयी सर्व ग्राम संघाकडून विचारणा करण्यात आली व ग्रामपंचायत लेखे सुद्धा तपासण्यात आले.
तसेच ज्या ग्रामसभांना अद्याप नीधी मिळाला नाही अशा ग्राम संघाचा ठराव घेऊन लवकरात लवकर निधी मिळवून देण्याचा प्रयत्न प्रभाग संघाने निर्णय घेतला.
उपस्थित प्रभाग संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उषाताई वानखेडे,सचिव , कोषाध्यक्ष कोल्हे ताई, लिपिका पडघान ताई, ग्राम संघाचे सर्व पदाधिकारी,प्रभाग समन्वयक विजय उगले, MCRP ,CRP, कृषीसखी ,पशुसखी उपस्थित होते.
0 Response to "उमेद अंतर्गत स्वतंत्र प्रभाग संघाची सभा..."
Post a Comment