
कळंबेश्वर येथे पोषण माहनिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
कळंबेश्वर येथे पोषण माहनिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पोषण पाककृती,विविध रांगोळी व पोषण दिंडी ठरली लक्षवेधी
वाशिम राष्ट्रीय पोषण माहनिमित्त १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम घेऊन पोषण महिना साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर येथे अंगणवाडी सेविकांकडून पोषण महिन्यानिमित्त विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात गरोदर महिलांचा ओटीभरण कार्यक्रम,रांगोळी स्पर्धा, पाककृती स्पर्धा ,सुदृढ बालक स्पर्धा, किशोरवयीन मुलींकरिता ऍनिमिया तपासणी शिबिर,पोस्ट खात्यामार्फत आधार कार्ड नोंदणी,सुकन्या समृद्धी योजना लाभार्थी नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला गट विकास अधिकारी किशोर काळपांडे,सरपंच श्रीमती वंजारे, उपअभियंता अशोक उगले, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक,पंचायत समिती सदस्य घुगे, उपसरपंच वानखेडे,विस्तार अधिकारी पळसकर ,शाखा अभियंता शेखर, सुधाकर काळे, सचिन चतरकर, श्रीमती राणे संरक्षण अधिकारी जउळकर तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी उपस्थितांना महिला व बालकांचे स्वास्थ्,पारंपारिक खाद्यपदार्थाचे सेवन,बालकांचे पोषणाबरोबर शिक्षण,लिंग संवेदनशीलता व जलसंधारण व्यवस्थापन,स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, गरोदरपणातील सुरुवातीचे १००० दिवस तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विविध स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विजेता किशोरवयीन मुलींचे स्वागत करण्यात आले.पोषण दिंडीमध्ये सहभागी सर्व पोषण दिंडीमधील वारकरी मंडळीचे सुद्धा श्रीमती पंत यांनी स्वागत केले.२३ वर्ष देशसेवा देऊन सेवानिवृत्त होऊन कळंबेश्वर येथे गावी आलेले धनगर यांचा सुद्धा यावेळी श्रीमती पंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, जनजागृतीच्या विविध स्तुत्य उपक्रमाबाबत आयोजकांचे श्रीमती वसुमना पंत यांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका श्रीमती साधना इथापे,नंदा झळके, मीनाक्षी सुळे तसेच कळंबेश्वर येथील अंगणवाडी सेविका संध्याताई चतरकर ,पार्वती कुऱ्हे व रेवती वाघ यांनी कार्यक्रमाची यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रास्ताविक मदन नायक तर संचालन देशमुख यांनी केले.कार्यक्रमाला गावातील महिला व सर्व किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Response to "कळंबेश्वर येथे पोषण माहनिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन"
Post a Comment