मुंगळा येथे अवैध सागवान लाकडे जप्त
मालेगांव - वनपरिक्षेत्रातील मुंगळा वर्तुळा अंतर्गत येत असलेल्याव मुंगळा - २ नियतक्षेत्रामध्ये१ मौजे वारंगी येथील संतोष अंबादास खोलगाडगे यांच्या घरामध्ये अवैध सागवान लाकडाचा साठा असल्या बाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले सदर इसमाच्या घराचा शेाध घेवुन मोक्यावर झडती घेतली असता सदर इसमाच्या घरामध्ये सागवान लाकडे मिळुन आली सदर सागवान लाकडे ही वनविभागाने जप्त करुन शासकीय लाकुड आगार मेडशी येथे पाठविण्यायत आले व आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सदर कार्यवाहि ही उपवनसंरक्षक विपुल राठोड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.मोरे, वनपरिक्षेत्र अधिकरी, काष्ट आगार मेडशी लक्ष्मी शाह, वनपाल पी.पी.चौधरि, वनपाल मुंगळा, वनरक्षक एस.टी.कुटे, एस. एल. शिंदे, आर. आर. राठोड, के. व्हीग. देवकर, कु. एम. डी. भोसीक, कु. एस. जी. पोपलवार, कु. के. आर. मुंडे इत्यादी वनकर्मचारी तसेच पोलिस हेडकॉन्टेनाख बल वाय. आर. जाधव, होमगार्ड जी. यु. शिंदे पोलिस कर्मचारी यांनी केली . सदर प्रकरणाचा पुढिल तपास पी. पी. चौधरि क्षेत्रसहाय्यक मुंगळा हे करित आहेत.
0 Response to " मुंगळा येथे अवैध सागवान लाकडे जप्त"
Post a Comment