स्वाधार शिष्यवृत्ती व मिनी ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रातिनिधिक वाटप
साप्ताहिक सागर आदित्य/
स्वाधार शिष्यवृत्ती व मिनी ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रातिनिधिक वाटप
वाशिम - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सामाजिक समता कार्यक्रम म्हणून ६ ते १६ एप्रिल या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे.
आज ८ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि लाभार्थी महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे जिल्हास्तरावर प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केले.अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल. बी. राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपअधीक्षक सातार्डेकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ.छाया कुलाल,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एम.जी वाठ,पोलीस निरीक्षक राठोड,माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख यांची उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रास्ताविक डॉ. छाया कुलाल यांनी केले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यामध्ये धीरज वरघट,प्रसेनजित पडघन, पल्लवी खिराडे, मोहिनी उचित,अंगद इनकर, धीरज पट्टेबहादूर,अनुराग साठे, ऋषिकेश जाधव, अक्षय कांबळे,धीरज धांडे ,साक्षी लबडे व संध्या रोकडे यांचा समावेश आहे.
उपस्थित काही लाभार्थ्यांनी स्वाधार योजनेमुळे आपल्याला शिक्षणासाठी खूप मोठा आधार झाल्याचे मनोगत व्यक्त केले.
अनुसूचित जातीतील नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा यावेळी लाभ दिलेल्या रमाई आंबेडकर स्वयंसहायता महिला बचतगट येवती ता. रिसोड येथील सचिव रमा सावळे, लक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगट शेलू( खडसे) ता. रिसोड येथील अध्यक्षा श्रीमती कांता बाजड, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी बचतगट,शेगी ता. मंगरूळपिर या बचतगटातील अध्यक्ष/ सचिव/ सदस्य यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन विधी अधिकारी किरण राऊत यांनी केले. आभार पोलीस उपअधिक्षक सातार्डेकर यांनी मानले. कार्यक्रमाला लाभार्थी विद्यार्थी तसेच बचतगटांच्या महिला लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
0 Response to "स्वाधार शिष्यवृत्ती व मिनी ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रातिनिधिक वाटप"
Post a Comment